परिचय

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे

पत्ता: ३, स्नेहदीप, चिंतामणीनगर, सहकारनगर नं. २, पर्वती, पुणे - ४११००९. मो -- ९३७१००५७७३.

जन्म: ११ मे १९४६ रा. ०२.०५ म्हणजे वस्तुत: १२ मे १९४६. विलेपारले, मुंबई येथे.
बालपण:
१९४६ ते १९५६ हा काळ कर्नाटकातील विजापूर या गावी. तिथल्या शाळेत वडील शिक्षक होते. त्या काळात मराठीपेक्षा कानडी भाषा चांगली येत होती. पुढे संपर्क तुटल्याने काळाच्या ओघात ती भाषा विसरली गेली.
शिक्षण:
९ वी पर्यंत, पारले टिळक विद्यालय. १० वी आणि ११ वी, डी.ए.व्ही. हायस्कूल मालाड, महाविद्यालयीन शिक्षण, इस्माईल युसुफ कॉलेज, जोगेश्वरी, मुंबई येथे इंग्लिश ( स्पेशल ) आणि मराठी ( सब.) विषय घेऊन बी.ए. १९६७ ची मार्चची परीक्षा सोडून दिली. अतिवाचनामुळे खूपसा अभ्यासक्रम करायचा राहून गेला होता. पुढे, बरेच भाग ऑप्शनमध्ये सोडून देऊन, थोडक्यात अभ्यास उरकून, कशीबशी पदवी मिळवली.
नोकरी:
सुरुवातीला उपसंपादक म्हणून किर्लोस्कर प्रेस, पुणे येथे. नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियात. तिथे १९६९ ते १९९६ नोकरी करून, डेप्युटी चीफ ऑफिसर पदावरून स्वेच्छानिवृत्ती.
कुटुंब:
आई गृहिणी. वडील हेडमास्तर म्हणून १९७२ साली निवृत्त. ते १९९० साली वारले. पत्नी ठाण्याची. १९७० साली विवाह. एक मुलगा, एक मुलगी. आता दोघेही विवाहित.
लेखन तपशील:
शाळेत असल्यापासून लेखन. सुरुवातीची प्रसिध्दी ’ प्रजामित्र ’ या मुंबईतील वर्तमानपत्रातून. पुढे चीनच्या युध्दाच्या वेळी एक समरगीत ’ नवशक्ति ’ या वर्तमानपत्रात आले. १९६३ ला पहिली कविता ’ झुंजुन गेल्या सरी ’ ’ सत्यकथे ’ त आली. त्यानंतर बरेच लेखन सत्यकथा, मौज, अभिरुची, हंस, किर्लोस्कर, मनोहर, टवाळकी, भरतशास्त्र, सुसा, गुलमोहर, नाटक, विविधा, श्रीशब्द, प्रतिष्ठान, अनुष्टुभ, व्यक्त-अव्यक्त, विशाल सह्याद्री, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, नाट्यरंग सकाळ, खेळ, ललित, परिवर्तनचा वाटसरू, साधना, दिव्य मराठी, इत्यादी नियतकालिकांतून प्रसिध्द. सुरुवात बरीचशी कविता लेखनाने. पुढे एकांकिका, नाटक, ललित, टीकात्मक, परीक्षणात्मक, इत्यादि लेखन.

१९६९ मध्ये ’ रंगायन ’ ने रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली ’ बस ’ ही एकांकिका सादर केली.
संगणकीकरण व वेबसाईट यांबद्दल

एकूण लेखनाचे संगणकीकरण दि. २७-०३-०३ या जागतिक रंगभूमी दिनी पूर्ण. हे संगणकीकरण वेळोवेळी अद्ययावत केले जाते.

सदर एकूण कामासाठी विशेष आभार :-

  1. १. आयलीप सॉफ्टवेअरसाठी -- सीडॅक, पुणे.
  2. २. प्रिया इन्फोर्मेटिक्स, पुणे.
  3. ३. संगणकीकरणासाठी - कै.एस.एन.प्रभुणे, पुणे.
  4. ४. सजावट- श्री. आशिष कारेकर, पुणे.
  5. ५. प्रमुख फाँट कन्व्हर्टर.
  6. ६. माझा मुलगा श्री. महेश देशपांडे – हे सर्व काम सुरू झाल्यापासून सतत सहकार्य.
  7. ७. माझी मुलगी सौ. अंजली पारखी हिचेही खूप सहकार्य – विशेषतः आय-लीप मधून सर्व मजकुराचे युनिकोडमध्ये परिवर्तन करणे.
  8. ८. सदर मजकुराची सीडी दि. ०२.०८.२००३ रोजी प्रा. माधव वझे यांच्या हस्ते पत्रकार भवन, पुणे इथे प्रकाशित झाली.
  9. ९. पहिली वेबसाईट दि. २८-०३-२००९ रोजी प्रकाशित झाली. नूतनीकॄत वेबसाईट २७-०९-२०१७ ला प्रकाशित झाली आहे व शेवटचे नूतनीकरण २४-०६-२०२३ रोजी केले.
  10. १०. डिझाईन श्री. राहुल पटवा यांनी केले आहे.
  11. ११. सुरुवातीच्या ‘ प्रारंभ ‘ पॄष्ठावरील फोटो श्री. श्रीनिवास पतके यांनी काढलेला होता. सर्व नाटकांवरील मुखपॄष्ठे श्री. प्रकाश बाळ जोशी यांची आहेत.
अ.नं. नाटक / दीर्घांक दिग्दर्शक दिनांक
१. राज्य (संगणकावर घेतलेले नाही.) अरुण पाटील १४-११-७७
२. एक गगनभेदी किंचाळी प्रसन्न जी.कुलकर्णी १९-११-७८
३. नातं प्रकाश बुध्दिसागर २१-०२-७९
४. दिनकर पुरोहितचा खून प्रकाश बुध्दिसागर ०६-११-७९
५. पोत्यातून गोत्यात (फक्त ‘ दिनकर पुरोहितचा खून ‘ या नावाने संगणकावर आहे.) काश बुध्दिसागर २४-०५-८१
६. डाव्या डोळयाखाली काळा तीळ (फक्त ‘ धागेदोरे ‘ या नावाने पुनर्लिखित संहिता संगणकावर आहे.) प्रसन्न जी.कुलकर्णी १८-०७-८२
७. नाणेफेक पं.सत्यदेव दुबे १६-१०-९४
८. धागेदोरे विद्यासागर अध्यापक २१-०२-९७
९. समतोल रवींद्र लाखे ३०-११-९८
१०. ढोलताशे विजय केंकरे १०-०९-९९
११. बुध्दिबळ आणि झब्बू गिरीश पतके ०६-११-००
१२. तुमचं आमचं सेम असतं गिरीश पतके ०९-०६-०२
१३. जणू काही वास्तव गिरीश पतके २५-०९-०३
१४. सामसूम राजू बावडेकर ०५-१२-०४
१५. सध्यातरी शेवट गोड समॄध्दी पानसे ०८-१२-०४
१६. गोळ्या काढलेलं पिस्तूल सुनील चौधरी १२-११-१४
१७. इराक़ चेतन दातार २०-०२-०५
१८. डावेदार गिरीश पतके २७-०२-०५
१९. निर्मिती सतीश ढेंबे ०१-०८-०६
२०. प्रेमच म्हणू याला हवं तर... रवींद्र लाखे २७-०९-०८
२१. ए, आपण चहा घ्यायचा ? (व्यावसायिकच्या दॄष्टीने काही बदल केलेले ‘ समतोल ‘.) अभिजित झुंजारराव १९-११-१२
२२. घोकंपट्टी -- --
२३. वस्तू रवींद्र लाखे ०९-११-१०
२४. ट्रायल -- --
२५. झालं गेलं विसरून जाऊ ( व्यावसायिकच्या दॄष्टीने काही बदल केलेले ‘ डावेदार ‘ ) गिरीश पतके ०१-०८-०९
२६. ढोलताशे ( भद्रकालीतर्फे व्यावसायिक ) विजय केंकरे २४-०१-१६
२७. मन ( ‘ मनाचे शोक ‘ या नावाने ) रवींद्र लाखे ०८-०२-१७
२८. इराक ( सुधारित ) -- --
२९. ढोलताशे ( कानडी ) मोहित टाकळकर ३१-१०-१६
३०. प्रेमच ….. हिंदीत ‘ रिनोव्हेशन ‘ गगन देव रियार आणि महेश केसकर ०७-११-१६
३१. दुरुस्त्या आणि देखभाल ( अभिवाचन ) ललित प्रभाकर १८-०२-१७

यांशिवाय काही कलाकृती, विनायक पडवळ, विनय आपटे, योगेश सोमण, ज्योत्स्ना डोंगरे, संजय पाटील, अनिल खोपकर, अनिरुध्द खुटवड, कुमार बडगुजर, सुनील मोझर, धनंजय गोळे, दिलीप वेंगुर्लेकर, भालचंद्र पानसे यांनीही दिग्दर्शित केल्या.

रंगायन, आविष्कार, मिती चार, वलय, महाराष्ट्रीय कलोपासक, पी.डी.ए., प्रत्यय, ट्रु फ्रेंडस थिएटर युनिट, स्नेह, इप्टा, अवकाश कलामंच, ऍक्टिव्ह थिएटर्स, भद्रकाली, प्ले ऑन, रंगशंकरा, इत्यादी नाट्यसंस्था तसेच बँका, कारखाने, सरकारी ऑफिसेस, शिक्षणसंस्था आदींनी नाट्यकृती सादर केल्या.

लेखनासाठी मिळालेली पारितोषिके खालीलप्रमाणे --

  1. १. संसाराणूपेंडघार (एकांकिका) आय.एन.टी. (१९७९)
  2. २. नाणेफेक (नाटक) लायन्स क्लब, दादर. (१९९४--९५)
  3. ३. समतोल (नाटक) लायन्स क्लब, दादर. (१९९८--९९)
  4. ४. ढोलताशे (नाटक) रंगदर्पण. (२०००)
  5. ५. बुध्दिबळ आणि झब्बू (दीर्घांक) रंगदर्पण. (२००१)
  6. ६.’ ढोलताशे ’ या नाटकासाठी महाराष्ट्र फ़ौंडेशनचा कै. रा. शं. दातार नाट्यपुरस्कार (२००३)
  7. ७. अ.भा. नाट्यपरिषदेचा आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार (२००३)
  8. ८. ‘ डावेदार ‘ या नाटकासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुरस्कार (२००५)
  9. ९. अ. भा. नाट्यपरिषद, पुणे शाखेचा रंगूमामा जोगळेकर स्मॄती चषक (२००५)
  10. १०. ’ डावेदार ’ या नाटकासाठी झी गौरव पुरस्कार. (२००६)
  11. ११. ‘ ढोलताशे ‘ साठी वाङ्‌मयसेवा प्रकाशन, नासिक रोड यांचा वाङ्‌मयसेवा सन्मान. (२००९)
  12. १२. ‘ बुद्धिबळ आणि झब्बू ‘ या पुस्तकासाठी , नाटक विभागातला, उत्कॄष्ट वाङमय निर्मितीसाठी दिला जाणारा, राज्यशासनाचा, राम गणेश गडकरी पुरस्कार. (२००८-९)
  13. १३. अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई यांचा, महाराष्ट्र शासन पुरस्कॄत, राम गणेश गडकरी पुरस्कार (२०१०)
  14. १४. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या खुल्या संकेतस्थळ स्पर्धेत www.champralekhan.com या वेबसाईटला विभागून तिसरा पुरस्कार.

लेखनाव्यतिरिक्त पारितोषिके --

  1. १. ‘इतिहास‘ एकांकिकेला ‘उन्मेष‘ स्पर्धेत प्रेक्षकपसंती प्रथम पुरस्कार. (१९७७-७८)
  2. २. ‘नातं‘ ला दूरदर्शनच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रथम पुरस्कार. (१९७९)
  3. ३. ‘इतिहास‘ या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार. (१९७८)
  4. ४. ‘नातं‘ ला पुरुषोत्तम करंडक. (१९९२)
  5. ५.‘एक गगनभेदी किंचाळी‘ हे नाटक अनागरी राज्यनाट्यस्पर्धेत अंतिम प्रथम. (१९७९)
  6. ६. ‘साक्ष मावळत्या सूर्याची‘ पुरुषोत्तममध्ये सर्वोत्कॄष्ट प्रायोगिक एकांकिका. (१९९९)
  7. ७. ‘बुध्दिबळ आणि झब्बू‘ ला म. टा. सन्मान. (२००१)
  8. ८. ‘डावेदार‘ ला झी गौरव पुरस्कार. (२००५)
  9. ९. ‘ढोलताशे‘ कामगार कल्याण स्पर्धेत राज्यात प्रथम. (२००२)
  10. १०. ‘समतोल‘ नाटकाच्या अनेक संस्थांनी केलेल्या प्रयोगांना वेळोवेळी अनेक पुरस्कार.
  11. ११. ‘डावेदार‘ ला सुदर्शन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार. (२००५)
  12. १२. ‘नाणेफेक‘, ‘ढोलताशे‘, ‘बुध्दिबळ आणि झब्बू‘, ‘सध्या तरी शेवट गोड‘, ‘एक गगनभेदी किंचाळी‘ या नाटकांना अनेक ठिकाणी अनेक पुरस्कार.
  13. १३. दिग्दर्शन, अभिनय, तंत्र इत्यादींसाठी वेळोवेळी अनेक पुरस्कार.
  14. १४. केंद्रात नंबरात येणे, विविध स्पर्धांत नामांकने हे अनेकदा.
  15. १५. सर्वच नाटकांच्या प्रयोगांना नाट्यसमीक्षकांचा चांगला प्रतिसाद.
अ.नं. दिनांक
१. अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. २६-०२-०० Modern Marathi Drama.
२. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. २१-०२-०२ मराठी रंगभूमी : सद्यस्थिती आणि आव्हाने.
३. अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे. २०-१२-०३ मराठी नाटकांचा आस्वाद व परीक्षण.
४. नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे. २८-०२-०४ Creativity and drama-followed by workshop on drama.
५. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. १५-०३-०५ नाटकाचा आशय आणि हेतू.
६. वसंत व्याख्यानमाला, पुणे. ०४-०५-०५ मराठी नाटक : रंजन आणि विचार.
७. मराठी विभाग, मुबई विद्यापीठ. ०७-०३-०७ ‘ढोलताशे‘ या नाटकावर चर्चा.
८. ‘आविष्कार‘, मुंबई ११-०२-०८ भवताल आणि कला.
९. नाट्यशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. १०-०९-०८ नाट्यवाचन व चर्चा आणि नंतर नाट्यलेखन कार्यशाळा.
१०. प्रा. एम. पी. पाटील, कॄतज्ञता सोहळा, केळकर-वझे महाविद्यालय, मुलुंड, मुंबई -- ४०००८१. २६-०४-०९ वर्तमान मराठी रंगभूमी (अध्यक्ष व अध्यक्षीय समारोप.)
११. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे. ०२-०४-१० नाटक आणि नैतिकता.
१२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. १९-०३-१६ नाट्यलेखन – मनोगत.
१३. अभिरुची, कोल्हापूर १०-०३-१७ आजचे नाटक.
१४. थर्ड बेल एंटरटेन्मेंट, पुणे. ( कलातीर्थ शब्दगौरव पुरस्कार ) २८-०५-१७ मराठी चित्रपट.
१५. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. १५-०२-१९ मराठी नाटकांमधील मिथकसॄष्टी.( अध्यक्ष )
१६. इतर अनेक नाट्यविषयक चर्चा, कार्यशाळा, उपक्रम, कार्यक्रम यांत वेळोवेळी सहभाग.
  1. १. इतिहास आणि इतर एकांकिका - सुपर्ण प्रकाशन, पुणे.
  2. २. नातं आणि राष्ट्र - अभिजात प्रकाशन, कोल्हापूर.
  3. ३. दोन नाटके - अभिजात प्रकाशन, कोल्हापूर (एक गगनभेदी किंचाळी आणि दिनकर पुरोहितचा खून)
  4. ४. कोरी कविता - शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर.
  5. ५. ओळख परेड (एकांकिकासंग्रह) - शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर.
  6. ६. दंगल (एकांकिकासंग्रह) - शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर.
  7. ७. ढोलताशे (नाटक) - आविष्कार आणि लोकवाङ्‌मय गॄह, मुंबई.
  8. ८. बुध्दिबळ आणि झब्बू (नाटक) - आविष्कार आणि लोकवाङ्‌मय गॄह, मुंबई.
  9. ९. एकेक सुटी एकांकिका अशा एकूण १९ पुस्तिका. - आभा प्रकाशन, पुणे.

एकूण लेखनाचे संगणकीकरण दि. २७-०३-०३ या जागतिक रंगभूमी दिनी पूर्ण.


सदर कामासाठी विशेष आभार :-
  1. १. आयलीप सॉफ्टवेअरसाठी -- सीडॅक, पुणे.
  2. २. प्रिया इन्फोर्मेटिक्स, पुणे
  3. ३. संगणकीकरणासाठी - श्री.एस.एन.प्रभुणे, पुणे.
  4. ४. सजावट- श्री. आशिष कारेकर, पुणे.
  5. ५. चित्रे --
सदर संगणकीकरण वेळोवेळी अद्ययावत केले जाते.
सूचना --

यातील सर्व लेखनाचे सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन. कोणत्याही उपयोगासाठी लेखी पूर्व-अनुमती घेणे आवश्यक आहे.