लेखक म्हणून तुम्ही ‘ भूमिका ‘ असण्याचे महत्त्व मानता का, सामाजिक-राजकीय-आर्थिक परिवर्तनासाठी तुम्ही लिहिता का,
‘ विवेक ‘ हेच अंतिम मानवी मूल्य आहे असे तुम्हाला वाटते का, आणि बुद्धिप्रामाण्यवाद हेच सर्वोच्च श्रेयस आहे, असे तुम्हाला वाटते का ?
-- या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर नाही असे आहे.

त्याचप्रमाणे, आहे ते, आहे असेच चालू राहावे, असे तुमचे मत आहे का ?
-- याही प्रश्नाला माझे उत्तर नाही असेच आहे.


मानवी जगण्याचे प्रवाही, कॄतिशील भान भाषेत व्यक्त होणे म्हणजे सर्जक लेखन.

-- चं.प्र. देशपांडे


As a writer do you have any ideology, do you write for social-political-economic reformation, do you consider that conscience is the main value and do you claim that thinking is the only way of understanding?
-- I have to reply NO to all these questions.

Similarly , to the question -- Are you a supporter of status quo ?
-- I have to say NO to this also.

The expression of the stream of active awareness of human living is creative writing.
-- C. P. Deshpande